Breaking Newsभारत

पुणे /चिंभळी :- पुस्तकेच  विद्यार्थ्यांच्या जीवनाला खरा आकार देतात 

पुणे /चिंभळी :- पुस्तकेच  विद्यार्थ्यांच्या जीवनाला खरा आकार देतात 

वार्ताहर :- श्री अनिल जोगदंड

‘”हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचा पुस्तकदोस्ती उपक्रम प्रेरणादायी ; ” राज्य ग्रंथालय संघ प्रमुख::-
कार्यवाहक सोपानराव पवार यांचे प्रतिपादन

चिंबळी : ग्रंथ,पुस्तके ही माणसाची खरे गुरू आहेत. ते ज्ञान, संस्कार, अनुभव आणि जीवनमूल्ये शिकवतात. ग्रंथांमधून महान व्यक्तींचे विचार, इतिहास आणि विज्ञानाची माहिती मिळते. ते योग्य-अयोग्याचा विवेक जागृत करून व्यक्तिमत्त्व घडवतात. त्यामुळे प्रत्येकाने नियमित वाचन करून ग्रंथांना आपला खरा गुरू मानावे.जीवनाला आकार देण्याचे मोठे काम प्रत्येकाच्या आयुष्यात पुस्तके करत असतात.पुस्तक दोस्ती उपक्रम हीच नीतिमूल्ये रुजविण्याचे काम करत असून हा प्रेरणादायी उपक्रम सर्वांनी आपलासा करण्याची गरज आहे.असे मत महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ प्रमुख कार्यवाहक सोपानराव पवार यांनी व्यक्त केले.

हुतात्मा शिवराम हरी राजगुरू पत्रकार संघाचे वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,चिंबळी (ता.खेड ) येथे पुस्तकदोस्ती
उपक्रमाचा शुभारंभ व गुरूपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी पत्रकार संघाच्या वतीने शाळेला पंधराशे अवांतर वाचनाची पुस्तके देण्यात आली.

संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, जिल्हाउपाध्यक्ष हनुमंत देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ प्रमुख कार्यवाहक सोपानराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम पार पडला.

सदर कार्यक्रमासाठी बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे, माजी संचालक पांडुरंग बनकर, सोसायटीचे तज्ञ संचालक दीपक बटवाल ,निघोजे ग्रामपंचायतीचे  उपसरपंच दिपक कांबळे सदस्य संदीप येळवंडे, युवा  उद्योजक श्रीकांत सोनवणे,माजी सरपंच शंकर  जैद, उपसरपंच राहुल चव्हाण,माजी ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब बटवाल, सदस्या राजश्रीताई जैद, युवा उद्योजक  सुमित जाधव, प्रशांत जैद ,शामराव बहिरट, सोपान बटवाल, तुकाराम बटवाल, बाळासाहेब मलगे, डॉ.प्रदीप पोफळे, बाबासाहेब गायकवाड, संजय बोथरा, सचिन आल्हाट, शंकर पोटवडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.यावेळी‌ अर्जुन अवघडे.साखरचंद लोखंडे,बाळासाहेब जाधव, संभाजी अवघडे,सुरेखा जैद‌‌ व सर्व शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमांचे संयोजन मुख्याध्यापक डी. के.चव्हाण,शालेय भौतिक सुविधा समिती सदस्य , पत्रकार संघाचे सहखजिनदार सुनील बटवाल यांनी केले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक  संघाचे अध्यक्ष श्रीकांत बोरावके,उपाध्यक्ष अविनाश राळे, आभार प्रसिद्ध प्रमुख अनिल जोगदंड यांनी मानले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा संघाचे उपाध्यक्ष हनुमंत देवकर यांनी सांगितले की गुरुपौर्णिमेच्या पवित्र निमित्ताने “पुस्तकदोस्ती” या उपक्रमाचा शुभारंभ होत आहे, याचा मला मनापासून आनंद आहे. पुस्तक हे केवळ कागदांचे बंधन नसून ते ज्ञान, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा मार्ग दाखवणारा खरा मित्र आहे. वाचनामुळे विचारशक्ती वाढते, कल्पनाशक्ती विकसित होते आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो.यामुळे तुम्हा आम्हा सर्वांच्या माध्यमातून हा उपक्रम अधिक अधिक वृद्धिंगत व्हावा हाच संकल्प या निमित्ताने आपण करू या.पुणे जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष मोहन महाराज शिंदे यांनी सांगितले की पत्रकार संघाने सुरू केलेला हा उपक्रम गोरगरीब, मध्यमवर्गीय, मजूर आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचवण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. एक विद्यार्थी – एक पुस्तक या संकल्पनेतून प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात ज्ञानाचा खजिना देण्याचा हा प्रयत्न आहे.

आपल्या घरातील वाचून झालेली पुस्तके धूळ खात पडून राहण्यापेक्षा एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करू शकतात. म्हणून या उपक्रमात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, पुस्तके दान करावीत आणि वाचन संस्कृती रुजविण्यास हातभार लावावा असे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button