आळंदी शहरातील वाहतूक कोंडी संदर्भातील प्रमुख समस्या

आळंदी शहरातील वाहतूक कोंडी संदर्भातील प्रमुख समस्या

१. शहरामध्ये वाढती वाहतूक कोंडी व बेशिस्त वाहन पार्किंग.
२. लग्नसराई, यात्रा, एकादशी व धार्मिक कार्यक्रमांमुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढ.
३. शहरात पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध नसणे.
४. चाकण चौक परिसरातील पार्किंग अपुरी पडणे.
५. मुख्य रस्ते, डी.पी. रोड व बायपास रस्ते अपूर्ण अथवा अविकसित असणे.
६. पुणे-आळंदी ६० मीटर रस्ता व इतर प्रमुख रस्त्यांची कामे प्रलंबित असणे.
७. रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणे.
८. प्रदक्षिणा मार्गावरील फुटपाथ असमतोल असल्याने भाविक रस्त्यावरून चालणे.
९. दिशादर्शक फलक व नो-पार्किंग फलकांचा अभाव.
१०. बेशिस्त रिक्षा, मालवाहतूक वाहने व रस्त्याकडेला पार्क होणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी.
११. देहूफाटा ते काळे कॉलनी परिसरातील खोदकामामुळे वाहतुकीस अडथळा.
१२. वाय जंक्शन परिसरातील मजूर अड्ड्यामुळे वाहतूक समस्या.
१३. शहरात जड वाहतुकीमुळे निर्माण होणारी कोंडी.
१४. स्पीडब्रेकर स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका.
१५. शहराचे क्षेत्र मर्यादित असल्याने वाहतूक नियोजनात अडचणी.
१६. मंगल कार्यालये व धर्मशाळांकडे स्वतंत्र पार्किंगची कमतरता.
१७. बाहेरून येणाऱ्या वाहनधारकांना पार्किंग व मार्गदर्शनाची माहिती न मिळणे.
१८. वाहतूक नियंत्रणासाठी आधुनिक यंत्रणा व CCTV सुविधेचा अभाव.
वाहतूक कोंडीवरील सुचविण्यात आलेल्या उपाययोजना
१. वडगाव रोड येथील नगरपरिषदेचे पार्किंग तातडीने सुरू करणे.
२. वाहनतळ आरक्षणाच्या जागेत बहुमजली पार्किंग व्यवस्था उभारणे.
३. शहरातील डी.पी. रोड, बायपास रस्ते व प्रमुख रस्ते तातडीने विकसित करणे.
४. पुणे-आळंदी ६० मीटर रस्ता व साखरे महाराज मार्ग विकसित करणे.
५. शहरातील अतिक्रमणे नियमितपणे हटविणे.
६. मुख्य रस्त्यांवर दिशादर्शक, पार्किंग व नो-पार्किंग फलक बसविणे.
७. प्रदक्षिणा मार्गावरील फुटपाथ सुधारणा करून पादचारी वापर वाढविणे.
८. बेशिस्त वाहन पार्किंग व रिक्षा चालकांवर कारवाई करणे.
९. मालवाहतूक वाहनांसाठी स्वतंत्र नियोजन व वेळेचे नियमन करणे.
१०. देहूफाटा परिसरातील खोदकामाची दुरुस्ती करून डांबरीकरण पूर्ण करणे.
११. वाय जंक्शन येथील मजूर अड्डा अन्यत्र स्थलांतरित करणे.
१२. शहरातील जड वाहतूक नियंत्रित अथवा बंद करणे.
१३. स्पीडब्रेकरवर पांढरे पट्टे मारणे.
१४. शहराबाहेरील उपलब्ध जागांमध्ये पार्किंग व्यवस्था विकसित करणे.
१५. परिवहन विभागाच्या उपलब्ध जागेवर पार्किंग सुविधा निर्माण करणे.
१६. मंगल कार्यालये व धर्मशाळांनी बुकिंगवेळी पार्किंगची माहिती ग्राहकांना देणे.
१७. DJ व कार्यक्रमांसाठी पोलीस परवानगी व नगरपरिषदेचा ना-हरकत दाखला बंधनकारक करणे.
१८. शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी CCTV कॅमेरे बसविणे.
१९. नगरपरिषद, पोलीस प्रशासन व नागरिक यांच्यात समन्वय वाढविणे.
२०. वाहतूक व्यवस्थापनासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन नियोजन राबविणे.



