Breaking Newsभारत

आळंदी नगरपरिषदेमार्फत ‘गौ-आहार संकलन टोपली’ उपक्रमाचा शुभारंभ

आळंदी नगरपरिषदेमार्फत ‘गौ-आहार संकलन टोपली’ उपक्रमाचा शुभारंभ

आळंदी नगरपरिषद, इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च (ICSSR) फंडेड प्रकल्प आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गौ-आहार संकलन टोपली’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत नागरिकांना विशेष संकलन टोपल्यांचे वाटप करण्यात आले.

सध्या घरांमधून मोठ्या प्रमाणात उरलेल्या चपात्या, भाजीपाल्याच्या साली, फळांच्या साली तसेच सुक्या चाऱ्यासारखे पदार्थ ओल्या कचऱ्यासोबत टाकून दिले जातात. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रणालीवरील ताण वाढतो तसेच ओल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लागल्यास अस्वच्छता निर्माण होण्याची शक्यता वाढते.

या समस्येवर उपाय म्हणून संशोधकांनी घरांमधील उरलेले शाकाहारी अन्न स्वतंत्रपणे संकलित करून ते जवळील दुग्धव्यवसाय केंद्रे, गोशाळा किंवा जनावरांच्या निवारा केंद्रांना पशुखाद्य म्हणून उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडली आहे. या उपक्रमामुळे अन्नाची नासाडी कमी होण्यास मदत होणार असून जनावरांकडून प्लास्टिक सेवन होण्याचा धोका कमी होईल. तसेच शहरात स्वच्छ, सुंदर व निरोगी पर्यावरण निर्मितीस चालना मिळणार आहे.

या कार्यक्रमास नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, विरोधी पक्षनेते आदित्य घुंडरे, गटनेते सचिन गिलबिले, नगरसेवक सागर कुऱ्हाडे, संतोष रासकर, नगरसेविका ऋतुजा घुंडरे, पूजा घुंडरे तसेच आळंदी नगर परिषदेचे सर्व नगरसेवक/नगरसेविका, अधिकारी, कर्मचारीवृंद, शिवसत्ता ग्रुपचे सदस्य आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच डीईएस पुणे विद्यापीठ, पुणे येथील प्रा. प्रसाद खांडेकर, डॉ. ललित कुलकर्णी, डॉ. अनिश गुप्ता, डॉ. शिल्पा देव, डॉ. पूनम देशपांडे आणि डॉ. दत्तात्रय देवळे हे या प्रकल्पावर कार्यरत असून सौ. विद्या गरुड या संशोधन सहाय्यक (Research Assistant) म्हणून कार्यरत आहेत.

लोकसहभागातून हा उपक्रम यशस्वी करून शहरातील अन्न नासाडी कमी करण्यासह पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button