आळंदी : आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक एक मध्ये मातृ-पितृ पूजन गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष मार्गदर्शन

आळंदी – आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक एक मध्ये मातृ-पितृ पूजन गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष मार्गदर्शन
ब्यूरोचिफ – विठ्ठल शिंदे
आळंदी — आज गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक 1 या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मातृ पूजन सोहळा संपन्न झाला. आपली प्रथम गुरु आई म्हणून माता पूजन करून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचाही पूजन करून सन्मान केला.अतिशय आनंदाचे वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या मातेचे पूजन केले आणि प्रत्येक मातेने भरभरून आशीर्वाद विद्यार्थ्यांना दिले.
आज गुरुपौर्णिमेनिमित्त सहज योगायोग निर्मित झाला तो म्हणजे मी ज्या शाळेमध्ये चौथी ते सातवी पर्यंत शिक्षण घेतले ती शाळा म्हणजेच आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक एक या ठिकाणी गुरु पूजन सोहळ्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन निर्मित केले होते त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहिलो असताना “गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ” त्या म्हणजे मी ज्या शाळेत होतो ती कौलारू शाळा होती आता मात्र ती दोन मजली सिमेंट काँक्रीटची शाळा झाली आणि एका वर्गाची चार वर्ग झाले अशा वाढत्या शिक्षण क्षेत्रातील विशेष शासकीय शाळेचा विशेष अभिमान वाटतो, मात्र या ठिकाणी शाळेचा स्टाफ हा कमी आहे तो वाढवण्यासाठी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी श्री माननीय माधव जी खांडेकर आपण ती आशा निश्चितच पूर्ण कराल अशी अपेक्षा आळंदीतील सर्व पालक वर्ग अपेक्षित करत आहेत. त्या वेळेची जाण, आनंद आज अनुभवला.. आम्हास निमंत्रित केल्याबद्दल सर्व गुरुवर्य व शालेय समितीचे विशेष मनःपूर्वक धन्यवाद.