Breaking News महाराष्ट्र

पुणे : तीर्थक्षेत्र आळंदीत शिवभोजन थाळी सुरु

तीर्थक्षेत्र आळंदीत शिवभोजन थाळी सुरु

पुणे ; विठ्ठल नारायण शिंदे “India Now24 ” ब्यूरो चीफ पुणे महाराष्ट्र..

पुणे जिल्हा वार्ताहर : दिनेश कुऱ्हाडे

आळंदी : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जेवणावळीचीही हॉटेले बंद आहेत. त्यामुळे आळंदी शहरातील मोलमजुरी, बेघर नागरिक, आळंदी शहर परिसरात झोपडीत वास्तव्यास असणाऱ्या गरीब नागरिकांना एकवेळचे अन्न मिळणेही कठीण जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरात घुंडरे आळी रस्त्यावर मोफत शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यात आले आहे.
गरजू नागरिकांना मोफत शिवभोजन थाळी मिळणार आहे. शिवसेनेच्या संकल्पनेतील बहुचर्चित या शिवभोजन थाळीचा विस्तार करण्याच्या निर्णय शासनाकडून घेण्यात आला असून तालुका या मुख्यलयांच्या ठिकाणी सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.कोरोना संसर्ग या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य भरात संचारबंदी करण्यात आली आहे. मोलमजुरी करून जगणाऱ्यांना झोपडीतून बाहेर पडणे कठीण झाले आहे. संचारबंदीमुळे अशा व्यक्तींना बाहेर पडून अन्न मिळविणे जिकरीचे होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. शिवाय आळंदी शहर परिसरात अनेक कुटुंब मजुरी करण्यासाठी आले आहेत त्यांना आॅनलाईन नोंदणी करून तसेच शिवभोजन अॅप वर फोटो किवा आधारकार्ड अपलोड करुन नोंदणी करता येईल असे आळंदी शहर शिवसेना संघटक माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे यांनी सांगितले. या शिवभोजन थाळी केंद्राचे नियोजन लक्ष्मण घुंडरे, रोहीणी रासकर आणि सुरज हाके पाहत आहे