Breaking News महाराष्ट्र

पुणे : आळंदीकरांना दिलासा करवाढ नसलेला अर्थसंकल्प मंजूर

पुणे : आळंदीकरांना दिलासा करवाढ नसलेला अर्थसंकल्प मंजूर

पुणे ;  विठ्ठल नारायण शिंदे “India Now24 ” ब्यूरो चीफ पुणे महाराष्ट्र

आळंदी ( पुणे ): आळंदी नगरपरिषदेने सन २०२१ – २२ या आर्थिक वर्षाचा सुमारे ४६ कोटी २० लाख ९५ हजार ६०० रुपयांचे अंदाजपत्रकीय तरतूदी असलेला तसेच ४ लाख २९ हजार १२७ रुपयांचे शिल्लकी व कर वाढ नसलेला तसेच आळंदीकरांना दिलासा देणा-या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेत मान्यता दिली असल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.
आळंदी नगरपरिषद सभागृहात नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. या सभेस उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया,मुख्याधिकारी अंकुश जाधव ,लेखापाल देवश्री कुदळे, विविध विषय समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविका, विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
या अर्थसंकल्पात सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी २ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनास २ कोटी ५० लाख रुपये खर्चाची तरतूद आहे. यावर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कोणतीही मिळकत कर व दरवाढीत करण्यात आलेली नाही. केवळ बांधकाम विभाग अंतर्गत आर्किटेक्ट नोंदणी शुल्क ५ हजार रुपये वरुण १० हजार रुपये शुल्क करण्यात आली आहे. कागदपत्रे नक्कल फी २०० रुपये करण्यात आली आहे. पालिकेच्या अंदाजपत्रकात शहराच्या विकासासाठी ४६ कोटी रुपये भांडवली व महसुली खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य सेवा सुविधा, स्मशान भूमी, बांधकाम रस्ते, शिक्षण, दिवाबत्ती, महिला व बालकल्याण, मागासवर्गीय कल्याणकारी योजना या सर्वांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे .
अर्थसंकल्पात ८ कोटी ९ लाख ९५ हजार ७२७ रुपये प्रारंभीची शिल्लक, ३८ कोटी १५ लाख २९ हजार रुपये जमा रक्कम तसेच एकूण ४६ कोटी २० लाख ९५ हजार ६०० रुपये भांडवली व महसुली खर्चासाठी तरतूद असून केवळ ४ लाख २९ हजार १२७ रुपये शिल्लक असलेला अर्थसंकल्प सभेत चर्चा होवून सर्वानुमते त्यास मंजूरी देण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले .