Breaking Newsमहाराष्ट्र

पुणे /आळंदी :- आळंदीत परिचारिका दिनी परिचारिकांच्या सत्कार

पुणे /आळंदी :- आळंदीत परिचारिका दिनी परिचारिकांच्या सत्कार

वार्ताहर :- अनिल जोगदंड

आरोग्य क्षेत्रातील परिचारिकांचे योगदान महत्त्वाचे आहे. या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून जगभरात परिचारिका दिनाचे आयोजन केले जाते. परिचारिकांची कार्य कोरोना काळात सर्वानी जवळून पहिले असून त्यांचे कार्याचा सन्मान व्हावा यासाठी आळंदी शहर भाजपचे वतीने आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनी अर्थात आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करीत आळंदीत परिचारिकांचा सन्मान आळंदी ग्रामीण रुग्णालयात उत्साहात करण्यात आला.

कोरोना काळात डॉक्टर तसेच आरोग्य वैद्यकीय प्रशासन यांचे खांद्याला खांदा लावून कोरोना काळात रुग्णांच्या उपचारात विशेष कार्य परिचारिकांनी केले आहे. या आरोग्य विषयक प्रभावी कार्याची दाखल घेत आळंदीत ग्रामीण रुग्णालयात सर्व स्टाफ आणि योगदानाबद्दल, कार्याचा आदर करण्यासाठी आळंदी स्टॅफ आणि परिचारिकांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी आळंदी देवस्थानचे माजी विश्वस्त डॉ. सारंग जोशी, भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, यशवंत संघर्ष सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कु-हाडे, भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख संजय घुंडरे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जी.जी.जाधव, कविता भालचिम, वैष्णवी देशमाने, वर्षा गाढवे, दीपा लोंढे, स्नेहा रेंगडे, सुषमा मुगावे, डॉ. विद्या कांबळे, अपेक्षा बोरकर, ललिता भोकरे , ऍड आकाश जोशी,ज्ञानेश्वर बनसोडे, सदाशिव साखरे, अशोक कावळे, अनिल जोगदंड, महादेव पाखरे, दिनेश कुऱ्हाडे, विठ्ठल शिंदे यांचेसह ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वृंद उपस्थित होते.

परिचारिका दिनी डॉ. सारंग जोशी, वैद्यकीय अधीक्षक गणपत जाधव,संजय घुंडरे,विष्णू कुऱ्हाडे,किरण येळवंडे, विठ्ठल शिंदे, अनिल जोगदंड आदींनी मनोगते व्यक्त करीत मार्गदर्शन करीत परिचारिकांच्या कार्याचे कौतुक केले. आळंदी ग्रामीण रुग्णालयाने कोविड काळात रुग्नांना चांगली आरोग्य सेवा दिल्याने रुग्नाची सोय झाली. आळंदी पंचक्रोशीतील रुग्नांचे आरोग्य सुव्यवस्थित रहाण्यास आळंदी ग्रामीण रुग्णायाचे योगदान मोठे राहिल्याने रुग्णालयाचे परिसरातून कौतुक मान्यवरांनी मनोगतावुन व्यक्त केले.

Related Articles

Back to top button