नोकरीतील सेवानिवृत्तीचे वय किती ? विविध मतप्रवाह …!

नोकरीतील सेवानिवृत्तीचे वय किती ? विविध मतप्रवाह …!
वार्ताहर :- ज्ञानेश्वर पि. जोंधळे
देशात २०२१ मध्ये ६० वर्षे पूर्ण केलेले जेष्ठ नागरिक १३.८० होते. ही संख्या २०३१ पर्यंत १९.४० कोटी होईल असा अंदाज आहे. २०११ च्या तुलनेत २०२१ मध्ये जेथ नागरिकांची संख्या ३.४० कोटींनी वाढली आहे सरकारी नोकरीत व खाजगी नोकरीत आज सेवानिवृतिचे वय देशात अगदी ५८ वर्षे वयापासून ते ६५ वर्षापर्यत आहे निवृत्तीचे वय विविध कंपन्या चे वेग वेगळे असू शकते आपणाकडे अनेक राज्यात ६० वर्षे हे निवृत्तीचे वय दिसून येते. न्यायालयात मात्र ते अगदी ६५ वर्ष इतके आहे. अलीकडे नागरिकांचे आयुर्मान वैद्यकीय सुविधा, योग्य आहार यामुळे वाढत चालले आहे साहजिकच पेन्शन पासून सारे लाभ देणे अतिशय आवाहनात्मक होऊ लागले आहे. अशा वेळी निवृत्तीचे वय वाढविल्यास त्यांना त्यांच्या राहिलेल्या आयुष्यात नियमित पेन्शन मिळणे सुलभ होईल यासाठी निवृत्तीचे वय सरकारने वाढवावे अशी मागणी भविष्य निर्वाह निधी संघटनेने केल्याचे वृत्त नुकतेच वाचले. जगातील इतर देशांचा विचार करता युरोपियन संघातील देशांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे आहे. डेन्मार्क, इटली तसेच ग्रीस मध्ये ६७ वर्षे एवढे निवृत्तीचे वय आहे. अमेरिकेत नागरिक ६६ वय वर्षी निवृत्त होतात. भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या मते अन्य देशाप्रमाणे भारतात सुद्धा निवृत्ती वय वाढविल्यास पेन्शन वर ताण येणार नाही. दीर्घ काळ पेन्शन मिळत राहिल्याने चलन वाढीशी मुकाबला करता येईल. आज देशात अनेक जेष्ठ नागरिक उत्तम प्रकृतीचे आहेत. त्यामुळे अनेकजण सेवानिवृत्ती नंतर खाजगी नोकरी करतात. आपल्या अनुभवाचा फायदा ते समाजाला देतात. शिक्षण, प्रशिक्षण, व्यवस्थापन आदी क्षेत्रात आजही अनेक नामवंत सेवानिवृत्त खाजगी क्षेत्रात काम करीत आहेत अशी सेवा देण्याचे दोन फायदे आहेत. एक पूर्वीपेक्षा कमी पगार मिळतो त्यामुळे आस्थापनाला ते; योग्य वाटते. व सेवानिवृत्ती धारकांना आपला वेळ योग्य तर्हेने जातो याचे समाधान वाटते. याशिवाय थोडीबहुत पैशाची प्राप्ती सुद्धा होते वाढलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलण्यासाठी हे आवश्यक आहे असे वाटते मध्यंतरी गुजरात सरकारने जेष्ठ नागरिकांना अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी दिल्या होत्या. अर्थात असे नोकऱ्या करण्यामुळे अनेक तरुणांना नोकऱ्या मिळविण्यात विलंब होईल असा एका मतप्रवाह आहे. व असा विलंब झाल्यास त्यांची कौशल्ये वाया जातील. आजही अनेक कर्मचारी अगदी ५५ वर्षानंतर काम करण्यास कार्यक्षमतेच्या अभावी नाखूष असतात. अशांची संख्या सुद्धा मोठी असू शकते काही खाजगी आस्थापनात सेवानिवृत्ती नंतर कर्मचाऱ्याला आहे त्याच पगारावर नोकरीस ठेवतात पण त्यांना पेन्शन इत्यादी सुविधा मिळत नाहीत एकूणच सेनानिवृत्तीचे वय वाढवावे किंवा कसे? या बाबतीत विविध मतप्रवाह आहेत असे दिसते.
शांताराम वाघ