Breaking Newsभारत

पुणे /आळंदी :- आळंदी शहरात विनापरवानगी फलक व बॅनर्सवर कारवाई

पुणे /आळंदी :- आळंदी शहरात विनापरवानगी फलक व बॅनर्सवर कारवाई

वार्ताहर:- अनिल जोगदंड

आळंदी शहरात वाढत्या अनधिकृत जाहिरात फलक व फ्लेक्समुळे निर्माण होणाऱ्या दृष्यार्ध व वाहतूक अडथळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषद प्रशासनाने विशेष स्वच्छता व अतिक्रमण विरोधी मोहिम राबवली आहे.

या मोहिमेअंतर्गत दिनांक ४ ऑगस्ट रोजी खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे:

1. पीएमटी बस स्टॉप ते पुणे रोड दरम्यान
– एकूण 90 अनधिकृत फलक / बॅनर्स हटविण्यात आले.

2. देहू फाटा ते साखरे रे महाराज पेट्रोल पंप दरम्यान
– एकूण 105 अनधिकृत फलक / बॅनर्स हटविण्यात आले.

यामध्ये मुख्य रस्ते, फूटपाथ, वीज खांब, सार्वजनिक भिंती तसेच वाहतूक मार्गात अडथळा ठरणारे सर्व प्रकारचे फलक हटविण्यात आले आहेत.

नगरपरिषदेने यासंदर्भात अनेक वेळा सूचना व आवाहन करूनही विनापरवानगी फलक व स्टँड बोर्ड लावणाऱ्या संबंधितांवर कार्यवाहीचा इशारा दिला होता. यानंतर विशेष भरारी पथकाद्वारे प्रत्यक्ष कारवाई करत शहरातील दृष्यार्थ व वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारे १९५ फलक हटविण्यात आले आहेत.

मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी स्पष्ट केले की, “शहरातील शिस्त व स्वच्छतेसाठी कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत जाहिरातींना स्थान दिले जाणार नाही. नागरिकांनी व व्यावसायिकांनी विनापरवानगी फलक लावू नयेत, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल.

पुढील टप्प्यात वडगाव रोड, प्रदक्षिणा मार्ग परिसरात विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button