आळंदी : जगद्गुरु तुकोबाराय यांची पालखी आळंदीत येणार मुक्कामी

जगद्गुरु तुकोबाराय यांची पालखी आळंदीत येणार मुक्कामी
विठ्ठल शिंदे
आळंदी :-संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० वे जयंती वर्ष व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे ३७५ वे वैकुंठ गमन वर्षाचा दुग्धशर्करा योग या वर्षाचे औचित्य साधून आपण आम्हा श्री संत तुकाराम महाराज संस्थानला पालखी परतीचे प्रवासात आषाढ वद्य दशमीचे दिवशी आळंदीस मुक्कामी यावे हे निमंत्रण दिले. त्याबद्दल आम्हा समस्त श्री संत तुकाराम महाराज यांचे सर्व वंशज मोरे मंडळींना अत्यानंद झाला.
सन १६८७ साली संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराजांनी पालखी सोहळा सुरू केला त्यावेळेस जाताना व येताना श्री क्षेत्र आळंदी मार्गेच पालखी प्रवास होत होता त्या आठवर्णीना या निमित्ताने उजाळा मिळत आहे.
तरी वरिल निमंत्रणाचा आम्ही श्री संत तुकाराम महाराज संस्थान व समस्त मोरे वंशज मंडळी स्विकार करत आहे. वरिल आषाढ वद्य दशमी रविवार दिनांक २०.७.२०२७ रोजी आम्ही पालखीसह आळंदीस मुक्कामी येत आहोत.
महाराजांच्या पालखीचे वारकरी परंपरेनुसार स्वागत व्हावे. माऊलींना ७०० वर्षपूर्ती सोहळा झाल्या वेळेस जेव्हा पालखी श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी आली होती आणि आता पुन्हा यावर्षी येतीये हा आनंद आळंदी पंचक्रोशीतील सर्व स्थानिक नागरिकांना वारकरी भाविक भक्तांना आनंदाचे वातावरण निर्मित करून संत संगम भेट या ठिकाणी निश्चित घडवून आणली हा योग संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान अध्यक्ष योगी निरंजननाथ, विश्वस्त निलेश लोंढे पालखी सोहळा अध्यक्ष भावार्थ देखणे, विश्वस्त एडवोकेट राजेंद्र उमाप, विश्वस्त पुरुषोत्तम पाटील, विश्वास तर अडवोकेट रोहिणी पवार. सर्वांच्या मागणीनुसार मोरे परिवारातील वंशज यांनी या बाबीला तात्परतेने होकार देऊन या उत्साह सोहळ्याला आनंदाचे डोही आनंद तरंग.. याप्रमाणे लेखी स्वरुपात कळविल्याबद्दल आळंदी ग्रामस्थ समस्त वारकरी संप्रदाय मंदिर समिती व नागरिकांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करण्यात आले. इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने संत संगम भेट सायकल रॅलीचे आयोजन आम्ही इंद्रायणी नदीसाठी केले होते त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी आम्हाला दिसून आली हाच आनंद आमच्या जीवनातला नदीचा प्रवाह ज्याप्रमाणे आहे त्या प्रवाहाला हा स्वच्छ करण्यास देहू संस्थान अग्रेसिव भूमिका निभावून आम्हास साथ संगत देतात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.