आळंदी – शहर स्वच्छतेबाबत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर पाचशे रुपये दंड – मुख्याधिकारी माधव खांडेकर

आळंदी – शहर स्वच्छतेबाबत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर पाचशे रुपये दंड – मुख्याधिकारी माधव खांडेकर
विठ्ठल शिंदे
आळंदी – शहरातील आजूबाजूच्या परिसरामध्ये सातत्यपूर्ण कचरा हा टाकण्याचे कार्य करणाऱ्यांवर कडक शासन पालिका प्रशासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आले त्याचबरोबर आळंदी शहराची स्वच्छता करणेकरीता २ शिफ्टमध्ये काम करण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात आलेल्या आहेत. त्यान्वये २ शिफ्टमध्ये शहरातील रस्त्यांची स्वच्छता केली जात आहे. तसेच शहरात निर्माण होणारा कचरा घंटागाडीतच टाकला जावा याकरीता आळंदी शहरात कोणीही व्यक्ती उघड्यावर कचरा टाकू नये याकरीता नगरपरिषदेच्या ६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यादरम्यान कोणी उघड्यावर कचरा टाकताना आढळून आल्यास दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. शहर स्वच्छ राखण्याकरीता नागरीकांनी आळंदी नगरपरिषदेस सहकार्य करावे. असे मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद यांचे वतीने आवाहन करण्यात येत आहे. उघड्यावर कचरा टाकणारे यांच्यावर ५०० रुपये दंड आकारण्यात येईल आळंदी पंचक्रोशीला जोडलेल्या सर्व ग्रामीण भागातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनाही याबाबत सतर्कता लक्षात असावी आपल्या परिसराला आपण स्वच्छ ठेवणे अन्यथा आपणास 500 रुपयाची दंडात्मक पावती स्वीकारून शेवटी अपमानास्पद वागणूक मिळण्याची शाश्वत निश्चित शक्यता आहे त्यामुळे सावधानतेणे इथून पुढे तरी कचरा रस्त्यावर टाकण्याचे बंधन पाळावे.