आळंदी – 100 मायक्रोन च्या खालील प्लास्टिक युज वर बंदी .. मुख्याधिकारी माधव खांडेकर

आळंदी – 100 मायक्रोन च्या खालील प्लास्टिक युज वर बंदी .. मुख्याधिकारी माधव खांडेकर
ब्यूरोचिफ विठ्ठल शिंदे
आळंदी – आळंदी शहरातील व्यापारी व व्यावसायिकांना शासनातील दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक मा. केंद्र सरकारच्या पर्यावरण व वने व हवामान बदल मंत्रालय अधिसुचना क्र. G.S.R.५७१ (E) दि. १२ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘सिंगल युज प्लास्टिक वर बंदी घातली असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत अधिक कठोर नियमावली तयार केली आहे. तरी १ जुलै, २०२२ पासून सिंगल युज प्लास्टिकच्या वापरास संपूर्ण देशात बंदी लागू असून सिंगल युज प्लास्टिक वापर करणा-यावर जागेवरच ५००/- रु तर संस्थात्मक पातळीवर प्रथम गुन्हयासाठी ५,०००/- रु, दुस-या वेळेस १०,०००/- रु व तिसऱ्या वेळेस २५,०००/- रु दंड व ३ महिने कारावासाची शिक्षा होणार आहे.
तसेच वारंवार सुचना देवूनही आळंदी शहरातील मोकळ्या परिसरात, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जातो. तरी सदर नोटीसद्वारे आपणास सूचित करण्यात येते की, प्रत्येक विक्रेत्याने स्वतः जवळ मोठ्या आकाराचे डस्टबीन ठेवणे बंधनकारक आहे. तसेच, ज्या विक्रेत्याजवळ डस्टबीन आढळणार नाही त्यांना जागेवर रू. ५००/- इतका दंड आकारण्यात येईल. तसेच कचरा उघड्यावर टाकल्याचे आढळून आल्यास ५००/- रु. दंडात्मक आकारणी करण्यात येईल याची नोंद घ्यावी.