संत श्रेष्ठ वासुदेवजी महाराज अवतीर्णोत्सव सोहळा

संत श्रेष्ठ वासुदेवजी महाराज अवतीर्णोत्सव सोहळा
🚩श्रीक्षेत्र आळंदी (देवाची) येथे संपन्न🚩
गुरवर्य वासुदेवजी महाराज जन्मोत्सव सोहळा दरवर्षी श्री क्षेत्र आळंदी (देवाची) या देविदास धर्मशाळा या ठिकाणी संपन्न झाला. जन्मोत्सवाच्या पूर्व संधेला श्री देवीदास धर्मशाळेमध्ये कलश स्थापना व श्री संत वासुदेवजी महाराजांच्या प्रथीमेचे पुजन करण्यात आले होते. पहाटे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधीचा महाभिषेक करण्यात आला. त्यांनंतर सकाळी १० ते १२ श्री ह.भ.प गुरुभक्तराज ज्ञानेश्वर महाराज बागलकर (आळंदी देवाची) यांचे काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनाला जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.त्यानंतर सर्व भाविकाना महाप्रसाद वितरीत करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन श्री संत भास्कर महाराज चँरीट्रेबल ट्रस्ट श्री संत वासुदेवजी महाराज भक्त परीवाराच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रम यशस्वीपणे साजरा करण्यासाठी सर्व वासुदेव महाराज भक्त परीवारा (आळंदी देवाची) याच्या वतीने व गुरू महाराजाच्या आशीर्वादाने सुंदर नियोजनात कार्यक्रम पार पडला।



