Breaking Newsभारत

पुणे /आळंदी :- आळंदी नगरपरिषद मार्फत २१ लाख कर्ज वाटप

पुणे /आळंदी :- आळंदी नगरपरिषद मार्फत २१ लाख कर्ज वाटप

“बचत गटांना बीज भांडवल वाटपाचा कार्यक्रम आळंदीत उत्साहात संपन्न “

वार्ताहर:- अनिल जोगदंड ( ब्युरो चीफ, क्राईम )

आळंदी, 30 जुलै 2025 — आळंदी नगरपरिषद अंतर्गत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना एकूण रु. 20,90,000/- इतक्याच्या विना तारण बीज भांडवलाचे वाटप दिनांक 30 जुलै 2025 रोजी करण्यात आले. हा कार्यक्रम नगरपरिषद कार्यालयात उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात खालील महिला बचत गटांना बीज भांडवलाचे वाटप करण्यात आले
जागृती महिला बचत गट – ₹3,20,000/-
सरस्वती महिला बचत गट – ₹3,60,000/-
अलंकापुरी महिला बचत गट – ₹3,65,000/-
संघर्ष महिला बचत गट – ₹3,65,000/-
तेजस्विनी महिला बचत गट – ₹3,20,000/-
इंदिरा महिला बचत गट – ₹3,60,000/-

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. श्री. ‘माधव खांडेकर’ (मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद) यांनी उपस्थित राहून महिलांना व्यवसाय विषयक मोलाचे मार्गदर्शन केले.
कुशाग्र संस्था यांच्यातर्फे सौ. गीता मॅडम यांची विशेष उपस्थिती लाभली.

“बीज भांडवल म्हणजे केवळ कर्ज नसून, महिलांच्या आत्मविश्वासाचा आणि स्वप्नपूर्तीचा पहिला टप्पा आहे,” असे उद्गार प्रमुख मार्गदर्शकांनी काढले.

या कार्यक्रमात विविध यशस्वी बचत गटांच्या पाच महिलांनी आपले अनुभव कथन करत व्यवसायात मिळालेल्या यशाबद्दल मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली पाटील यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन करण्यात आले

सौ. सुवर्णा काळे – अध्यक्ष, श्री स्वामी समर्थ शहर उपजीविका केंद्र
सौ. अर्चना भिसे – कार्यालयीन प्रमुख, आळंदी नगरपरिषद
सौ. वैशाली पाटील – सहा. प्रकल्प अधिकारी
श्री अर्जुन घोडे व सौ. सोनाली रत्नपारखी – समुदाय संघटक
तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला बचत गटांना उद्योजकतेसाठी आर्थिक पाठबळ देऊन त्यांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने भक्कम पाऊल टाकण्याची संधी मिळाली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button