Breaking Newsभारत

खंडणी विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक गुन्हे शाखा व काळेवाडी पोलीस ठाण्याची संयुक्त कामगिरी

खंडणी विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक गुन्हे शाखा व काळेवाडी पोलीस ठाण्याची संयुक्त कामगिरी

५० लाख रुपयाच्या खंडणीसाठी एका इसमाचे अपहरण करुन त्यास उत्तरप्रदेश येथे घेवुन जात असताना आरोपींचा थरारक पाठलाग करुन अपहृत इसमाची सुखरुप सुटका करुन, ०५ आरोपींना अटक करुन, त्यांचेकडुन दोन देशी बनावटीचे पिस्टल, ०६ जिवंत काडतुस व इतर साहीत्य असा एकुण १८,२८,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त…

आदरणीय सर..
दिनांक ०९/०३/२०२६ रोजी १७.१५ वा. शिवराजनगर येथील फाऊन्टन हॉटेलचे समोरील लेनमध्ये, रहाटणी, पुणे येथे फिर्यादी यांचा भाऊ (व्यापारी) यांना ०५ अनोळरखी इसमांनी त्यांच्याकडील काळ्या रंगाच्या स्विफ्ट कार नं. यु.पी-७०-९२७२ यामधून खंडणी करीता जबरदस्तीने अपहरण करून फिर्यादी यांचेकडे ५० लाख रुपयांची मागणी करून ५० लाख रुपये खंडणी न दिल्यास सुरेशकुमार यास जिवे ठार मारण्याबी धमकी दिली. फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन काळेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. १०१/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४०(१), १४०(२), ३(५) अन्वये अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून, मा. पोलीस आयुक्त यांनी गुन्हा उघडकीस आणणेकरीता, पोलीस उप आयुक्त गुन्हे डॉ शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे-१ डॉ. विशाल हिरे व गुन्हे-०२ श्री प्रविण मोरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा व काळेवाडी पोलीस ठाण्याच्या वेगवेगळ्या टिम तयार करुन, अपहरण झालेल्या इसमांची सुखरुप सुटका करुन, आरोपीतांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. दाखल गुन्हयाचे अनुषंगाने माहिती घेत असतांना अपहरण झालेल्या इसमास आरोपी काळया रंगाचे स्विफ्ट मधुन उत्तरप्रदेश येथे घेवून गेल्याचे समजले. त्यानंतर घटनास्थळावरील व परीसरातील सीसीटीव्ही चेक करुन संशयित इसमांची गाहिती प्राप्त करुन, त्यांचे मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करुन, त्यादरम्यान *खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेकडील पोउपनिरी सुनिल भदाणे, पोलीस अमंलदार प्रदीप गोडांबे, विजय नलगे, गणेश गिरीगोसावी, ज्ञानेश्वर कुन्हाडे* यांना आरोपीस शोध घेणेकामी रवाना करण्यात आले. आरोपीकडून तक्रारदार यांना वेळोवेळी खंडणीच्या पैशाकरीता फोन येत असल्याने त्याचे तांत्रिक विश्लेषण करून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर मा. श्री सोमनाथ घार्गे यांचेशी संपर्क करुन दाखल गुन्हयाबाबत माहिती देवून मदत करण्याबाबत विनंती केली. तसेच आरोपीने पैसे घेवून आळेफाटा येथे बोलाविल्याने आळेफाटा येथे गुन्हे शाखेकडील खंडणी पथकाकडील ०१ टिमद्वारे सापळा लावण्यात आला होता.

त्यानंतर खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, संगमनेर विभाग यांचे पथकाने संगमनेर टोलनाका येथे सापळा लावून छापा कारवाई करुन, आरोपी नामे १) चंद्रशेखर दिपचंद गौड, वय ३४ वर्षे, रा. सरदारगंज, ता. मेहनगर, जि. आजगगड, राज्य-उत्तरप्रदेश २) दिलीप गोहनलाल सरोज, वय २८ वर्षे, रा. रायपूर, ता. बारव, जि. प्रतापगड ३) रिकु अलगुराम सरोज, वय २० वर्षे, रा. बरहुआ, भोजपूर, ता. सदर, जि. प्रतापगड, ४) अनिल गिरधारीलाल सरोज, वय २६ वर्षे, रा. मु. पो. सलीमभदारी, ता. लालगंज, जि. प्रतापगड, ५) मुकेशकुमार राममुरत चमार, वय २४ वर्षे, रा. मु. पो. काशीपुर, ता. कान्डा, जि. प्रतापगड, यांना *दोन देशी पिस्टल, सहा जिवंत राऊंड, ०५ मोबाईल, फिर्यादी यांचे ०७ लाख रुपये किमतीचे घडयाळ, स्विफ्ट कार नं. यु.पी.-७०-एच.आर ९२७२ व इतर मुद्देमाल असा एकूण १८,२८,०००/- रुपये किं चा मुद्देमालासह* ताब्यात घेण्यात आले.

तसेच अपहृत इसम यास आरोंपीनी चंदनापुरी घाट, संगमनेर येथे सोडुन दिले होते त्यास गुंडा विरोधी पथकाकडील श्री सपोनि हरीष गाने, गणेश मेदगे, विक्रम जगदाळे, अमित गायकवाड, गंगाराम चव्हाण, नितीन गेगजे, शाम बाबा, रामदास मोहिते, तौसीफ शेख यांनी शोध घेवुन सुखरुप ताब्यात घेतले. अपहृत इसमाची माहिती देणारा एक आरोपी निष्पन्न करुन आरोपी नामे संतन सुरेश चव्हाण, वय ३५ वर्षे, रा. समा कॉलनी, काळेवाडी, पुणे मुळ रा. चकलाधर, ता. सदर, जि. अजामगड, राज्य-उत्तरप्रदेश यास काळेवाडी पोलीस ठाणे कडील वपोनि राजेंद्र बहिरट, पोनि सुरेंद्र धुमाळे, सपोनि वैभव गुरव, स्वप्निल खेतले, प्रमोद कदम, अशोक जायभाये, अतीक शेख, भारत पारधी, विजय गोरे, अनिल सावंत, अजय फल्ले, भारकर भारती, रमेश खेडकर, गणेश जाधव, रमेश ब्राम्हण यांनी ताब्यात घेतले. पाच अटक आरोपीतांना पुढील कार्यवाहीकामी काळेवाडी पोलीस ठाणे ताब्यात देण्यात आले असून, सदर गुन्हयाचा पुढील तपास काळेवाडी पोलीस ठाणे करीत आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त मा. श्री. विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, मा. डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे मा. श्री. सारंग आव्हाड, अप्पर पोलीस आयुक्त, प्रादेशिक विभाग, मा. श्री. डॉ. बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०२, विशाल गायकवाड, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१ डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२, श्री. प्रविण मोरे, यांचे मार्गदर्शनाखाली, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोउपनि सुनिल भदाणे, श्रेणी पोउपनि अमर राऊत, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, गणेश गिरीगोसावी, ज्ञानेश्वर कुन्हाडे, भुपेंद्र चौधरी, किशोर कांबळे, किरण जाधव, दादाभाऊ साबळे तसेच गुंडा विरोधी पथकाचे श्री सपोनि हरीष गाने, गणेश मेदगे, विक्रम जगदाळे, अमित गायकवाड, गंगाराम चव्हाण, नितीन गेगजे, शाम बाबा, रामदास मोहिते, तौसीफ शेख व काळेवाडी पोलीस कडील वपोनि राजेंद्र बहिरट, पोनि सुरेंद्र धुमाळे, सपोनि वैभव गुरव, स्वप्निल खेतले, प्रमोद कदम, अशोक जायभाये, अतीक शेख, भारत पारधी, विजय मोरे, अनिल सावंत, अजय फल्ले, भास्कर भारती, रमेश खेडकर, गणेश जाधव, रमेश ब्राम्हणे यांचे पथकाने केली आहे..

आदरपूर्वक सादर

(राजेंद्र पाटील)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा
पिंपरी चिंचवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button