आळंदी : चर्होली खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांची झाली चाळण, गल्लीबोळातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य.

चर्होली खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांची झाली चाळण, गल्लीबोळातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य.
आळंदी दि. २( वार्ताहर ) : आळंदी नगरपरिषद हद्दीला लागून असलेली चर्होली खुर्द ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीचा विस्तार आळंदीपेक्षा मोठा आहे, केळगाव रस्ता ते वडगाव रोड (घाट), धानोरे फाटा ते मरकळ रोड व चर्होलीगाव अशा या मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या हद्दीमध्ये गल्लीबोळातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे, ठीक ठिकाणच्या रस्त्याच्या कडेने रस्त्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचे ढीग दिसत आहेत, त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य खऱ्या अर्थाने धोक्यात येत आहे, वडगाव रोड, बन्सीलाल गोडाऊन शेजारी असणारा वाहतुकीचा रस्ता, गेली अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असून, या ठिकाणी रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे, चिखलाचे साम्राज्य पसरले आहे, त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य खऱ्या अर्थाने धोक्यात आले आहे, याविषयी ग्रामपंचायतीला वेळोवेळी कळवून देखील ग्रामपंचायत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्त्या नियती ताई शिंदे यांनी सांगितले. येत्या आठ दिवसात या ठिकाणचे रस्ते दुरुस्त करावेत, रस्त्यावरील कचरा हटवावा अशी मागणी जोर जोर लागली आहे, या सर्व गोष्टींकडे ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.