आळंदी : आळंदी नगरपरिषद शाळा एक २००७ चे गेट-टुगेदर

आळंदी : आळंदी नगरपरिषद शाळा एक २००७ चे गेट-टुगेदर
ब्युरोचीफ – विठ्ठल शिंदे
आळंदी – गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी, अठरा वर्षांनी पुन्हा शाळा भरली त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे एकमेका बाबत असलेली उत्सुकता व आपुलकी या ठिकाणी दिसून आली.
आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक १, इयत्ता ७ वी ब २००७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आळंदीमध्ये उत्साहात साजरा झाला.यावेळी प्रमुखपाहुणे म्हणुन मुख्याध्यापिका औटी मॅडम,वर्गशिक्षिका अंबुस्कर मॅडम,कुऱ्हाडे मॅडम,जोशी मॅडम,बहिरट सर,आढळ सर तसेच माजी विध्यार्थी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे,विनायक कुऱ्हाडे,गोविंद मुंडे,महेश काळे,सुजित खटके,दत्ता कदम,गीता शेवाळे,मीना डोंगरे ,सुनिता पाचरणे ,सारिका जावळे, निर्मला शिंदे, इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करून मुलांनी समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जवळपास १८ वर्षानंतर पुन्हा एकदा या मुलांचे शाळा भरली होती.कार्यक्रमांमध्ये मुलांना संबोधित करताना वर्ग शिक्षका अंबुस्कर मॅडमनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थने प्रमाणे समाजसेवा,देशसेवा व सर्वांशी प्रेमाने वागण्याचा सल्ला दिला.
पर्यावरण पूरक कार्य आणि सातत्यपूर्ण यापुढे करत राहू अशी ग्वाही सर्व मित्रमंडळींनी दिली आपल्या नदी परिसराला आपण स्वच्छ ठेवण्यात सातत्यपूर्ण प्रयास निश्चितच करू.