आळंदी – आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक एक मधील माजी विद्यार्थी सुनील घुंडरे वाढदिवसानिमित्त टीव्ही संच सप्रेम भेट

आळंदी – आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक एक मधील माजी विद्यार्थी सुनील घुंडरे वाढदिवसानिमित्त टीव्ही संच सप्रेम भेट
ब्युरोचीफ विठ्ठल शिंदे
आळंदी – आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि माऊली कृपा डेव्हलपरचे सर्वेसर्वा सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील बाळासाहेब घुंडरे पाटील यांच्या वाढदिवसाचे अवचित के साधन त्यांनी आपल्या आळंदी शाळा क्रमांक 1 या शाळेला सदिच्छा भेट देऊन तीन टीव्ही संच दिले आणि शाळेच्या भौतिक आणि गुणवत्तापूर्ण विकासासाठी मोलाचा हातभार लावला त्याबद्दल त्यांचे शालेय प्रशासन आणि सर्व शिक्षक वृंद आणि पालकांच्या वतीने अभिनंदन आणि आभार मानण्यात येत आहे. यापुढेही शाळेच्या भौतिक विकासामध्ये त्यांचा मोलाचा वाटा ते उचलणार आहेत तसेच त्यांच्यासोबत शाळेमध्ये श्री राहुल घुंडरे श्री गोरख घुंडरे श्री अक्षय घुंडरे श्री अमोल माने श्री रोहन सस्ते श्री लखन घुंडरे श्री ऋषिकेश डहाके आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या पुढील गुणवत्ता पूर्ण विकासासाठी शाळेच्या डाव्या बाजूने विद्यार्थ्यांना पोषणार खाण्यासाठी तसेच वाचन कट्टा म्हणून चौथरा बांधून देण्याचे सुद्धा उपस्थित मान्यवरांनी ग्वाही दिलेली आहे.