Breaking Newsभारत

आळंदी : आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक एक दोन तीन चार शिक्षकांच्या बदल्या…

आळंदी – आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक एक दोन तीन चार शिक्षकांच्या बदल्या…

एकाच ठिकाणी दहा वर्ष शैक्षणिक बदलासाठी निर्णय.

विठ्ठल शिंदे.

आळंदी नगर परिषदेच्या शाळा क्रमांक एक ते चार मधील दहा वर्ष पूर्ण झालेला 24 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत

माधव खांडेकर
मुख्याधिकारी तथा प्रशासक
आळंदी नगरपरिषद

शिक्षण विभागाच्‍या दिनांक ७ एप्रिल २०२१ रोजीच्‍या शासन निर्णयानुसार शिक्षकांच्‍या सेवाजेष्‍ठता विचारात घेवून सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्ष पुर्ण केलेल्‍या शिक्षकांची वास्‍तव्‍य जेष्‍ठतेप्रमाणे बदली करण्‍याचे निर्देश दिलेले आहेत. त्‍यानुसार दिनांक १० जून २०२५ रोजी १० वर्ष पुर्ण झालेल्‍या शिक्षकांच्‍या बदल्‍या करण्‍यासाठी बदली पात्र शिक्षकांच्‍या याद्या प्रसिद्ध करुन प्रस्‍ताव सादर करणेबाबत प्रशासन अधिकारी, नगरपरिषद शिक्षण मंडळ यांना कळविले होते. यास अनुसरुन प्रशासन अधिकारी, नगरपरिषद शिक्षण मंडळ, आळंदी यांनी सेवा जेष्‍ठतेप्रमाणे यादी प्रसिद्ध करुन मुख्‍याधिकारी, आळंदी नगरपरिषद यांना सादर केली. तदनंतर मुख्‍याधिकारी, आळंदी नगरपरिषद यांचे दालनात दिनांक ११ जून २०२५ रोजी शिक्षकांच्‍या बदल्‍या करण्‍यासाठी बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत १० वर्ष पुर्ण झालेल्‍या उपशिक्षक व उपशिक्षीका यांची सेवाजेष्‍ठता विचारात घेवून कार्यरत असलेल्‍या नगरपरिषदेच्‍या शाळेतून दुस-या नगरपरिषद शाळेत बदली करणेसाठी पारदर्शपणे चिठ्या काढुन बदली करण्‍यात आली आहे. तसेच पदवीधर शिक्षकांसाठी त्‍यांच्‍या विषयातील इतर नगरपरिषद शाळेतील रिक्‍त असलेल्‍या जागेवर बदली करण्‍यात आली आहे. कार्यरत शाळेत १० वर्ष पुर्ण झालेल्‍या उपशिक्षक व उपशिक्षीका यांच्‍या बदल्‍यामध्‍ये
१)श्रीअंकुश लक्ष्‍मण बहिरट यांची शाळा क्र.३ मध्‍ये २)रहीम समशेभाई तांबोळी यांची शाळा क्र. २ मध्‍ये ३)सौ. सोनाली सुधीर भायनाक यांची शाळा क्र. ४ मध्‍ये ४)श्री नागनाथ आप्‍पाराव कुंभार यांची शाळा क्र. १ मध्‍ये ५)सौ. मोहिनी राजेंद्र साठे यांची शाळा क्र. २ मध्‍ये ६)श्री सुभाष विठोबा मलघे यांची शाळा क्र. १ मध्‍ये ७)श्री दत्‍तात्रय विनायक ढेंगळे यांची शाळा क्र. ३ मध्‍ये ८)सौ. मंगला राजेंद्र वंजारे यांची शाळा क्र.४ मध्‍ये ९) सौ. विजया भाणूदास इंगळे यांची शाळा क्र. ४ मध्‍ये १०)श्री सचिन तानाजी मंडलीक यांची शाळा क्र.३ मध्‍ये बदली करण्‍यात आलेली आहे.

तसेच सदर बैठकीत पदवीधर शिक्षक व शिक्षीका यांची दुस-या नगरपरिषद शाळेत विषयानुसार रिक्‍त असलेल्‍या शाळेत बदली करण्‍यात आली असून यामध्‍ये
१)सौ. वैशाली ज्ञानेश्‍वर तोत्रे यांची शाळा क्र. ४ मध्‍ये २)श्री मारुती कोंडु आढळ यांची शाळा क्र. ३ मध्‍ये ३)सौ. सुवर्णा सुरेंद्र तरटे यांची शाळा क्र. ३ मध्‍ये ४)सौ. रेश्‍मा राजेंद्रकुमार गोवेकर यांची शाळा क्र. १ मध्‍ये ५)सौ.मंजूशा नितीन आल्‍हाट यांची शाळा क्र. १ मध्‍ये ६)श्रीमती सुनिता बबन गव्‍हाणे यांची शाळा क्र. ४ मध्‍ये ७)श्रीमती राजश्री चंद्रकांत सातपुते यांची शाळा क्र. ४ मध्‍ये ८)सौ.सुनंदा रामचंद्र चांदगुडे यांची शाळा क्र. ३ मध्‍ये ९)सौ. सोनाली शशिकांत आटोळे यांची शाळा क्र. १ मध्‍ये १०) सौ. माधुरी प्रकाश भागवत यांची शाळा क्र. १ मध्‍ये ११)श्री जहीर शफिक सय्यद यांची शाळा क्र. ३ मध्‍ये १२) श्रीअमोल साहेबराव बढे यांची शाळा क्र. १ मध्‍ये १३) सौ. दिपाली विवेकानंद गायकवाड यांची शाळा क्र. ४ मध्‍ये व १४)श्रीमती संगिता सुरतसिंह राजपुत यांची शाळा क्र. १ मध्‍ये इत्‍यादी पदवीधर शिक्षकांच्‍या बदल्‍या करण्‍यात आल्‍या आहेत.
उपशिक्षक व उपशिक्षीका तसेच पदवीधर शिक्षक व शिक्षीका यांच्‍या सेवा जेष्‍ठतानुसार कार्यरत आळंदी नगरपरिषद शाळेच्‍या इतर आळंदी नगरपरिषद शाळेत बदल्‍या करण्‍यात आल्‍या असून सर्व उपशिक्षक व उपशिक्षीका तसेच पदवीधर शिक्षक व शिक्षीका यांना बदली नंतरच्‍या शाळांमध्‍ये रुजु होण्‍याच्‍या सुचना मुख्‍याधिकारी यांनी बैठकीत दिल्‍या आहेत. तसेच त्‍यांचे स्‍वतंत्र आदेश तयार करण्‍यासाठी प्रशासन अधिकारी यांना सुचना करण्‍यात आल्‍या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button