आळंदी : आळंदी ग्रामीण भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर.

आळंदी – आळंदी ग्रामीण भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर.
ब्युरोचिफ विठ्ठल शिंदे
आळंदी –आळंदी ग्रामीण भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली.
कार्यक्रमामध्ये स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आरोग्य विभागाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. रक्तदान शिबिरातून अनेक गरजूंना जीवनदान मिळण्यास हातभार लागणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने संपूर्ण राज्यांमध्ये एकाच वेळी महा रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते आळंदी ग्रामीण मंडळाच्या वतीने साई मंगल कार्यालय आळंदी देवाची या ठिकाणी शिबिर आयोजित केले होते शिबिरामध्ये उस्फूर्त असा प्रतिसाद दिसून आला मान्यवरांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला
प्रथमता रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य परिषदेचे सदस्य व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक रामशेठ गावडे पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्याप्रसंगी मंडळातील सर्व कार्यकर्ते व रक्तदान करणारे रक्तदाते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
राज्यामध्ये एकाच वेळी सर्व ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केल्यामुळे ह्या महा रक्तदान शिबिराची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होईल असे उद्गार यांनी व्यक्त केले. या प्रसंगी मंडल अध्यक्ष अमोल विरकर,माजी सभापती कल्पना गवारी, माजी सरपंच पाटीलबुवा गवारी, ज्येष्ठ नेते पांडुरंग ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब थिटे, सरचिटणीस राहुल घोलप, सोमनाथ गवारी, वासुदेव मुंगसे, दिलीप मुंगसे, दत्तात्रय मुंगसे,युवा मोर्चा चे रवींद्र ठाकूर, किशोर सूर्यवंशी, संतोष ठाणगे, देविदास बवले, नवनाथ गावडे,महिंद्र गावडे, संतोष ठाकूर, बाळासाहेब ठाकूर, संभाजी घेनंद, गहिनीनाथ लोखंडे, सुरेश लोखंडे व मंडल कार्यकारिणीचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. आळंदी शहराचे शहराध्यक्ष किरण भाऊ येळवंडे यांनी कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले व रेड प्लस रक्तपेढी यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.
हाच सामाजिक उपक्रमाचा आदर्श ठेवत पुढील काळातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे आयोजकांनी सांगितले.