Breaking Newsभारत

आळंदीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समोर चिखला गाव येथे झालेल्या घटने प्रकरणी तीव्र निषेध

आळंदीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समोर चिखला गाव येथे झालेल्या घटने प्रकरणी तीव्र निषेध

पुणे जिल्हा जनसामान्यांच्या विकासनामा प्रतिनिधी ( अरुण कुरे )— आळंदी देवाची येथील समाज बांधव यांनी चिखलात गाव घटनेच्या पार्श्वभूमीवर आळंदी करांच्या वतीने एकजूटीने निषेध व्यक्त केला आहे.

चिखला गाव (ता. लोणार, जि. बुलढाणा) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक उभारणीस विरोध करत काही समाजकंटकांनी निर्माण केलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा आळंदी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सर्व समाजबांधवांच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

सदर घटनेत एका महिलेसोबत झालेल्या झटापटीचा व स्मारक उभारणी रोखण्याच्या प्रयत्नाचा संताप व्यक्त करत आळंदी देवाची येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.

घटनेचा तीव्र निषेध व कारवाईची मागणीआंदोलनकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असून त्यांच्या स्मारकाला विरोध करणे ही गंभीर बाब आहे. महिलेशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच चिखला गावात स्मारक उभारणी सुरळीतपणे व्हावी, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती या निषेध आंदोलनात विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मा. नगरसेवक प्रकाश शेठ कुऱ्हाडे पाटील,ज्ञानेश्वर कुऱ्हाडे पाटील,शिवसेना (उबाठा) गटाचे मा. नगरसेवक आनंदराव मुंगसे पाटील, सामाजिक कार्यकर्ते निसार भाई सय्यद,शिवसेना (उबाठा) आळंदी शहर उपप्रमुख शशी राजे जाधव,शिंदे पाटील,मराठा सेवक अरुण कुरे पाटील,बालाजी शिंदे पाटील,दत्ता शिंदे पाटील,ज्ञानेश्वर मोरे पाटील,बालासाहेब टेकाळे,माऊली टेकाळे पाटील,भागवत शेजुळ पाटील,आदींसह अनेक शिवप्रेमी व समाजबांधव उपस्थित होते.

शिवरायांच्या जयघोषात आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात वातावरण दुमदुमून गेले. सर्वांनी एकमुखाने सांगितले की, महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या शिवरायांच्या स्मारकास कुठल्याही परिस्थितीत विरोध सहन केला जाणार नाही.

आळंदी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सर्व समाजबांधवांनी एकजूट दाखवत चिखला येथील घटनेचा निषेध केला असून संबंधितांवर कठोर कारवाई व स्मारक उभारणीस संरक्षण देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button