Breaking Newsभारतमनोरंजनस्पोर्ट्स

आय ए एस 1850 सायकल स्वरांची पुणे पंढरपूर पुणे 500 किमी सायकल वारी चे नववे वर्ष संपन्न

आय ए एस 1850 सायकल स्वरांची पुणे पंढरपूर पुणे 500 किमी सायकल वारी चे नववे वर्ष संपन्न

भारतातील क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रा अग्रणी काम करणारी आय ए एस ( इन्डो अथलेटिक्स सोसायटी ) तर्फे सालाबाद प्रमाणे होणाऱ्या पुणे पंढरपूर पुणे सायकल वारीचे शनिवारी 7 जून रोजी पहाटे दोन वाजता देहू येथील गाथा मंदिर येथून प्रस्थान करण्यात आले. यंदाचे वर्ष सदर सायकल वारीचे नववे वर्ष असून यावर्षी तब्बल 1850 हून अधिक सायकलपटूंचा सहभाग यामध्ये नोंदवण्यात आला आहे.

एमआयडीसी चे सीईओ श्री नितीन वानखेडे, प्रकाश शेटबाळे, पीसीएमसी चे सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या अधिकारी सुधाकर गुडीपट्टी, ग्रीष्मा बिस्वल, गरवारे टेक्निकल फायबरचे संदीप निकम, उद्योजक अण्णारे बिरादर, माणिक डावरे, वसंत इंडस्ट्रीजचे अनिल मित्तल, यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.
सदर वारीचे नववे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सर्व 1850 हून अधिक सभासद एक दिवसात देहू ते पंढरपूर असे 250 किलोमीटर पूर्ण करणार आहेत तर दुसऱ्या दिवशी पंढरपूर ते आळंदी अशी परतीची वारी करणार आहेत.

सायकल वारी मार्ग-
देहू – निगडी – नाशिक फाटा – हडपसर – उरुळी कांचन – भिगवन – इंदापूर – टेंभुर्णी – पंढरपूर आणि दुसऱ्या दिवशी याच मार्गावरून परतीचा प्रवास झाला. यंदाचे विशेष म्हणजे पावणे चारशे हुन अधिक महिलांनी यामध्ये सहभाग घेतला तर शंभरहून अधिक लहान वयोगटातील मुलांचा सहभाग होता, बेंगलोर हून 50 जण तर मुंबईहून 168 जण यावर्षी सहभागी झाले. टेंभुर्णी येथे सामाजिक कार्यकर्ते संजय कोकाटे तर इंदापूर येथे डॉ. कदम गुरुकुल यांच्यातर्फे सायकल वारकऱ्यांना अल्पोपहार वाटप करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या चा नियोजना मध्ये इंडो ऍथलेटिक सोसायटी चा जम्बो टीमचं सहभाग आहे यामध्ये गिरीराज उमरीकर, श्रीकांत चौधरी, अमित पवार, अजीत गोरे, रमेश माने, सुशील मोरे, अविनाश चौघुले, श्रेयस पाटील, प्रतीक पवार, मारुती विधाते, चिंतन देसाई, दादासाहेब नखाते, प्रशांत तायडे, रोहित जयसिंघनी, योगेश तावरे, प्रमोद चिंचवडे, प्रदीपजी टाके, अविनाश अनुशे, मदन शिंदे, नितीन पवार, दीपक नाईक, कपिल पाटील यांच्यातर्फे महत्वाची भूमिका बजावणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button