Breaking News देश राज्य होम

२२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर एस टी बंद ; २५ ते २६ नोव्हेंबर संचारबंदीची शक्यता पंढरपूर येथे कार्तिकी वारीत अनेक निर्बंध

पुणे : २२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर एस टी बंद ; २५ ते २६ नोव्हेंबर संचारबंदीची शक्यता पंढरपूर येथे कार्तिकी वारीत अनेक निर्बंध

पुणे ;  विठ्ठल नारायण शिंदे “India Now24 ” ब्यूरो चीफ पुणे महाराष्ट्र

पुणे जिल्हा वार्ताहर : दिनेश कुऱ्हाडे

पुणे :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या वर्षीची आषाढी वारी रद्द झाली आणि आता कार्तिकी वारीवरही कोरोनाचे संकटामुळे प्रशासनाकडून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी पंढरपूर शहरात संचार बंदी लागू होण्याची शक्यता आहे .कार्तिकी वारीत अनेक निर्बंध आहे, २२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर एस टी बंद ; २५ ते २६  नोव्हेंबर संचारबंदीची शक्यता वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे येणार्‍या वारकरी दिंड्यांना शासनाने मज्जाव केला असताना. २२  नोव्हेंबर पासून २६  नोव्हेंबर पर्यंत पंढरपूर परिसरातील एसटी सेवा देखील बंद करण्याचा प्रस्ताव पोलीस विभागाच्या वतीने राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.
आषाढी नंतर कार्तिकी वारी देखील निर्बंधात होणार आहे. यामध्ये दोन दिवस संचारबंदी लागू होण्याची शक्यता आहे. तसेच शहरात वारकर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होऊ नये. याकरिता 22 नोव्हेंबर पासूनच एसटी सेवा बंद करण्याची तयारी पोलिस प्रशासनाने केली आहे. याबाबतचा आदेश लवकरच राज्य शासनाकडून पारित होईल. तसेच कार्तिकी वारी बाबत नुकतीच वारकरी प्रतिनिधींशी चर्चा झाली आहे. वारकर्‍यांच्या काही मागण्या शासन दरबारी पोहोचून त्याबाबत लवकरच तोडगा काढला जाईल. आषाढी प्रमाणे निर्मनुष्य कार्तिकी वारी पंढरपुरात होईल. यासाठी सतराशे पोलीस आणि अधिकार्‍यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी झेंडे म्हणाले. प्रसंगी पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम उपस्थित होते.