Breaking News देश राज्य होम

पुणे : संत तुकाराम महाराज मंदिर २५ ते २७ नोव्हेंबर पर्यंत भाविकांसाठी बंद

संत तुकाराम महाराज मंदिर 25 ते 27 नोव्हेंबर पर्यंत भाविकांसाठी बंद

पुणे ;  विठ्ठल नारायण शिंदे “India Now24 ” ब्यूरो चीफ पुणे महाराष्ट्र
पुणे जिल्हा वार्ताहर : दिनेश कुऱ्हाडे
पुणे : श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सर्व भाविक भक्तांना आव्हान करण्यात येते कोरणाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर गेले आठ महिने बंद होते परंतु शासनाच्या आदेशानुसार दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर दिनांक 16 नोव्हेंबर पासून मंदिर खुले करण्यात आले आहे, तरी आता येणारी पंढरपूरची कार्तिकी एकादशी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी आहे या दिवशी संत तुकाराम महाराज मंदिरात तसेच देहूमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने संत तुकाराम महाराज मंदिर दिनांक 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत भाविकांसाठी बंद राहील.
या कालावधीमध्ये मंदिरात होणारे नित्य नियमांचे कार्यक्रम महापूजा किर्तन इत्यादी संस्थानचे वतीने करण्यात येतील असे संत तुकाराम देवस्थान मार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.