Breaking News देश राज्य होम

पुणे : आळंदीकरांचे आरोग्याचा विचारकरूनच कार्तिकी यात्रेचे आयोजन करावे : आळंदी ग्रामस्थांची मागणी

पुणे ;  विठ्ठल नारायण शिंदे “India Now24 ” ब्यूरो चीफ पुणे महाराष्ट्र

पुणे जिल्हा वार्ताहर : दिनेश कुऱ्हाडे

आळंदीकरांचे आरोग्याचा विचारकरूनच कार्तिकी यात्रेचे आयोजन करावे : आळंदी ग्रामस्थांची मागणी
मर्यादित वारकर्‍यांच्या उपस्थित यात्रा भरावी
आळंदी : महाराष्ट्रात दोन महत्त्वाच्या एकादशी पैकी कार्तिकी एकादशीला तीर्थक्षेत्र आळंदीत ७ ते ८ लाख भाविकांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधी सोहळा आयोजित करण्यात येत असतो यंदा आळंदीची कार्तिकी यात्रा ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत आहे, यानिमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध संताच्या दिंड्या आळंदीत येत असतात.
सध्या आळंदी शहरात रोज ४ ते ५ कोरोणा बाधित रुग्ण सापडत असून भविष्यात कार्तिकी यात्रेत होणारी गर्दी लक्षात घेता कोरोणाचा आळंदी शहरात शिरकाव रोखणे गरजेचे असून त्यादृष्टीने आळंदीकरांच्या आरोग्याचा विचार करूनच कार्तिकी यात्रेचे आयोजन मोजक्याच वारकर्‍यांच्या उपस्थित करण्यात यावे अशी मागणी आळंदी ग्रामस्थांनी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीला निवेदन देऊन केली आहे सदर लेखी स्वरूपात निवेदन सह व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांनी स्वीकारले. हे निवेदन प्रातिनिधिक स्वरूपात आळंदीकर ग्रामस्थांच्या ज्ञानेश्वर कुर्‍हाडे, प्रसाद बोराटे, डि.एच.कुर्‍हाडे यांनी दिले, या निवेदनावर भाजप सोडून इतर सर्व राजकीय पक्षांनी सह्या केल्या आहेत.
कार्तिकी यात्रा चार दिवसांची होईल त्यामुळे संपूर्ण आळंदीकरांचे तसेच पंचक्रोशीतील नागरिकांचे आरोग्य यात्रेत होणार्‍या गर्दी मुळे धोक्यात येऊ शकते, महत्त्वाचे कारण म्हणजे विजयादशमी नंतर आळंदी शहरात ४ ते ५ रुग्ण आढळून येत असून कार्तिकी यात्रेत महाराष्ट्रातून येणारे भाविक भक्त, छोटे मोठे व्यावसायिक यांच्या माध्यमातून कोरोणाचा प्रादुर्भाव होऊ शकतो तसेच महाराष्ट्र शासनाने मोठ्या कौशल्याने कोरोणा रोगावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केला असून त्याच्यावर विरजन पडू नये म्हणून आपल्या सर्वांचे आरोग्याचा विचार करूनच कार्तिकी यात्रेचे आयोजन मोजक्याच वारकर्‍यांच्या उपस्थित करण्यात यावे जेणे करून कोरोणाचा प्रादुर्भाव रोखता येईल.