गुजरात : राष्ट्रीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाला विजेतेपद

गुजरात : राष्ट्रीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाला विजेतेपद
ब्युरोचिफ: विठ्ठल शिंदे
स्पोर्ट्स अथोरिटी ऑफ गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सांघिक प्रथम विजेतेपद पटकाविले. यजमान गुजरात संघ दुसर्या तर छत्तीसगड संघ तिसऱ्या स्थानावर राहिला.
सदर स्पर्धा भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघाच्या मान्यतेने व गुजरात मिक्स बॉक्सिंग संघटनेच्या वतीने 25 व 26 मे कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन सर्वात तरुण आय पी एस शफीन हसन यांच्या हस्ते करण्यात आले तर पारितोषिक वितरण उत्तर भारतीय विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामसिंह ठाकूर ,अहमदाबाद शहराध्यक्ष विनय मिश्रा,
राष्ट्रीय मिक्स बॉक्सिंग संघटनेचे महासचिव सचिन शिंगोटे , तांत्रिक संचालक आणि आयोजक भानू प्रताप सिंग राजपूत, भूपेंद्र सिंग राजपूत, 3 वेळा गुजरात श्री विजेता महेश मौर्य , गुजरात साई बॉक्सिंगचे माजी प्रशिक्षक बी एस राजपूत इ.मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सामनाधिकारी म्हणून कोमल शिंदे काळभोर, हिमांशू कुमार यांनी काम केले. तर स्पर्धेत पंच म्हणुन अनुराधा फुगे, श्रद्धा प्रसाद, राहुल निकम ,अजय साबळे,दीपक खेडकर, राजू चौरागडे मालती लीलारे यांनी काम केले.
विजयी स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे: मुली मनुश्री पाटील,चंचल खेडकर,साक्षी पाटील, कौशिकी जाधव, तनया कलशेट्टी,चैत्राली लांडगे, तनवी गव्हाणे, तनुष्का कलशेट्टी, अनुराधा फुगे, वैष्णवी शिंगोटे, श्रद्धा सिंग, ऋतुजा मार्के,युवराज गोरे, सदन अन्सारी,ओम माटे, कल्याण साबळे,रुद्र माळी.