Breaking News देश राज्य होम

आंळदी पुणे ; आळंदीत कोविड केअर सेंटरला सर्वोतोपरी सहकार्य करणार :- खासदार कोल्हे

आंळदी पुणे ;  विठ्ठल नारायण शिंदे “India Now24 ” ब्यूरो चीफ पुणे महाराष्ट्र..

                      आंळदी देवाची

 रिपोर्टर :         अनिल जोगदंड

आळंदीत कोविड केअर सेंटरला सर्वोतोपरी सहकार्य करणार :- खासदार कोल्हे

आळंदी  : राज्यातील कोविडच वाढता प्रादुर्भाव पाहता शिरूर लोकसभा मतदार संघातील वैद्यकीय सेवेचा आढावा घेत अधिकारी,कर्मचारी,पदाधिकारी यांचेशी संवाद साधण्यास खासदार अमोल कोल्हे यांनी आळंदी दौरा केला.यावेळी त्यांनी आळंदीतील कोविड केअर सेंटरच्या कामाची माहिती घेत सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.

आळंदी येथील ग्रामीण रुग्णालयात या प्रसंगी डॉ.शुभांगी नरवडे, डॉ.श्रीनिवास कोलड,रुग्ण दक्षता समितीचे सदस्य माजी नगरसेवक डी.डी.भोसले,नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे,सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई कु-हाडे,माजी नगराध्यक्ष बबनराव कु-हाडे आदी उपस्थित होते.

यावेळी ग्रामीण रुग्णालयातील कामाची आरोग्य सेवेची माहिती घेत खासदार डॉ. कोल्हे यांनी संवाद साधला. येथील एमआयटी महाविध्यालयात कोविड केअर सेंटर विकसित करण्यात येत आहे.या कामाची माहिती घेतली .यावेळी त्यांनी आळंदीत आरोग्य सेवा प्रभावी व सक्षम राहील याची दक्षता घेत  आरोग्य सेवेस सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे सांगितले.

आळंदीत इंद्रायणी कॅन्सर रुग्णालयास पीपीई किटचे वाटप

येथील आळंदी चाकण रस्त्यावरील इंद्रायणी कँसर रुग्णालयास खासदार अमोल कोल्हे यांनी भेट दिली. यावेळी रुग्णालयासह परिसरातील व मतदार संघातील हॉस्पिटलला पीपीई किट चे वाटप करण्यात आले.माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी मुख्य विश्वस्त डॉ. संजय देशमुख यांचेसह विश्वस्त पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रुग्णालयातील कामकाजाची पाहणी करून खासदार कोल्हे यांनी संवाद साधला. रुग्णालय कोविड १९ च्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या शासनाचे नियमांचे पालन करीत असल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन गोसावी यांनी सांगितले. येथील कामाची माहिती घेत वैद्यकीय सेवेचे कौतुक केले.